सोलापूर निमा
दहावीचा निकाल जाहीर, मुलीचं अव्वल स्थानी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल आज जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल हा ९५. ८१ टक्के लागला असून यात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९९. १ टक्के लागला आहे. पुणे विभागाचा निकाल हा ९६ टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल घोषित केला आहे. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,६०,१५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४९,३२६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,८४,४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८१ आहे.