शालेय शहर तायक्वांदो स्पर्धा मध्ये रावजी सखाराम हायस्कूल ऑफ कॉमर्स चे वर्चस्व
-
शालेय शहर तायक्वांदो स्पर्धा मध्ये
रावजी सखाराम हायस्कूल ऑफ कॉमर्स चे वर्चस्वसोलापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राजीव गांधी इनडोअर स्टेडियम सात रस्ता येथे झालेल्या शालेय तायक्वांदो स्पर्धेमध्ये विविध वजनी गटात रावजी सखाराम हायस्कूल ऑफ कॉमर्स च्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली
विविध वजनी गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत रावजी सखाराम हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी 3 सुवर्ण, 3 रौप्य व 3 कांस्य अश्या एकूण 9 पदकांची कमाई करत स्पर्धेत विद्यालयाचा दबदबा निर्माण केला.
मेडल प्राप्त विद्यार्थी –
सुवर्णपदक
सानिका गायकवाड
मल्लिकार्जुन कोणे
आराव जोंजटरौप्यपदक
संस्कृती सोनवणे
संचिता सोनवणे
महेश कांबळेकास्य पदक
संजना कवडे
रोहित सुतकर
ओंकार सुतकरतसेच या पदक विजेत्यांची निवड 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यानअहमदनगर येथे होणाऱ्या विभागीय_तायक्वांदो_स्पर्धेसाठी झाली आहे.
सर्व पदक विजेते खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक साळवे सर व सोमनाथ बनसोडे सर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय मोहिते व क्रीडा शिक्षक अजहर शेख , जेष्ठ शिक्षक वसंत नागणे, आण्णा दिक्षित, संतोष वालवडकर ,आनंदकुमार मुरूमकर व प्रशालेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील कारकीर्द शुभेच्छा दिल्या.